अकोला : अतिवृष्टी मुळे महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन पॅकेज जाहीर केले. मात्र या पॅकेज मध्ये 24 जिल्ह्यातील विशेषता पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील काही तालुके सुटले. ही बाब लक्षात येताच आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांची भेट घेतली. शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे एकाही शेतकऱ्याचे नुकसान खपवून घेणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.https://youtu.be/YYdmYyQl66E?si=qmvhYMXBafI3iVQo
या संदर्भात मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, महसूल सचिव रागिनी सिंगल तसेच संपत सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या भावना पोहोचविल्या. शासन या संदर्भात लवकरच सुधारित जीआर काढून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार आहे असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
आज आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. भ्रमणध्वनीवर विभागीय आयुक्त, महसूल मंत्री, महसूल सचिव, कृषी मंत्री, कृषी सचिव तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या भावना तसेच अकोला जिल्ह्यातील तीन तालुके बुलढाणा जिल्ह्यातील आठ तालुके अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके वाशिम जिल्ह्यातील चार तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आठ, तालुके यांचा समावेश नसल्याबद्दल निदर्शनास आणून दिले.
खासदार अनुप धोत्रे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते त्यांनी सुद्धा अनेक समस्या मांडल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उप विभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे, कृषी अधिकारी किरवे तसेच जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी संतोष शिवरकर किशोर पाटील,डॉक्टर अमित कावरे, अंबादास उमाळे, माधव मानकर, शंकरराव वाकोडे, विठ्ठल वाकोडे, राजेश बेले , पंकज वाडी वाले अनिल गावंडे दिगंबर गावंडे संजय गावंडे गोविंद गोयंका, चंद्रकांत अंधारे गिरीश जोशी संजय जोशी गणेश लोड संजय कोरडे वैभव माहोरे, सुबोध गवई, सागर तायडे जय कृष्ण ठोकळ प्रशांत ठाकरे, रवी गावंडे राजेश ठाकरे किरण थोरात, विठ्ठल चतरकर, अनमोल गावंडे, डॉक्टर किरण ठाकरे सुलभा सोळंके आधी प्रामुख्याने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या