शिवाजी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात
अकोला : संपूर्ण जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे तत्व आचरणात आणण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केले. श्री शिवाजी महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरील विचार व्यक्त केले.
लाल लाल बहादूर शास्त्री महात्मा गांधी व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तसेच रोपट्याला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी डॉक्टर संजय तिडके उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून सर्वोदय मंडळाचे सदस्य रामराव पाटेखेडे लाभले होते. यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्राध्यापक सुशीला मळसणे, डॉक्टर अर्चना पोटे, डॉक्टर अस्मिता बडे, प्राध्यापक श्रीकृष्ण तराळे, प्राध्यापक रूपाली सरोदे उपस्थित होते.
रामराव पाटेखेडे यांनी आपल्या विनोदी शैलीतून काव्यरचना सादर करीत उपस्थितांना पोट धरून हसायला लावले. प्रास्ताविक डॉक्टर अर्चना पोटे, संचालन शिल्पा शिंदे आणि आभार प्रदर्शन सुशील जाधव यांनी केले. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या