श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0





अकोला : शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने (shri shivaji college) यावर्षी देखील बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा 88.57% कला शाखेचा 72.66 % वाणिज्य शाखेचा 81.67% निकाल लागला आहे. कला शाखेतील साक्षी नागसेन शिराळे हिने 91.33% प्राप्त करीत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला.

कला वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचे मिळून एकूण 566 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ८२.६८% असून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 58.33% लागला.





विज्ञान (science) शाखेतून कृष्णा अविनाश बोर्डे या विद्यार्थ्याने 90.33 टक्के गुण प्राप्त करीत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याचप्रमाणे प्रियानी बंडू नाना मातळे 81.67%,  प्रणव राजू शहा 80.33%, पलक राजू झांबरे 79.67%, भक्ती राजेश जोशी 79 टक्के, सोहम ओमप्रकाश वाडेकर याने 74.67% गुण पटकावले आहेत.





कला (Arts) शाखेतून साक्षी नागसेन शिराळे हिने 91.33% प्राप्त करीत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. त्याचप्रमाणे राधिका रामधन साबळे 88.33%,  अमन राजेश गोपनारायण याने 85% गुण प्राप्त केले.




वाणिज्य (commerce) शाखेतून रेणुका शैलेश केळकर हिने 91 टक्के गुण प्राप्त करीत वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे हर्षाली पखारे 83.17, इशा रवींद्र काळे 80.67% गुण पटकावले. 


उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील हर्ष रामनाथ तिवारी 63.67 टक्के गुणासह प्रथम आला आहे.


बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा श्री हर्षवर्धनजी देशमुख तथा सन्माननीय संस्था कार्यकारिणीसह महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. रामेश्वर भिसे यांनी अभिनंदन केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी प्रा. सुशीला मळसणे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. गोविंद काळे, समन्वयक प्रा विजय इंगळे, कला विभाग प्रमुख डॉ. अर्चना पोटे,  वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अस्मिता बढे, प्रबंधक राजेश गीते  तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)