https://tumchyasathich.blogspot.com/2025/03/blog-post_14.html
खतांना अनुदान (सबसिडी) देण्याची मागणी
अकोला : आत्मनिर्भर भारत या संकल्पने अंतर्गत सर्व क्षेत्रात प्रगतिशील भारताची निर्मिती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतकरी राजा सुखी राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे असेल तर नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्या खतांना सबसिडी देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी आज खासदार अनुप धोत्रे यांनी लोकसभेत मांडली.
संसदेमध्ये खासदार अनुप धोत्रे यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
भारताचे कृषी क्षेत्र हे देशाच्या GDP मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ही पर्यावरणपूरक, पोषणक्षम खते आहेत.यांच्या वापरामुळे अत्याधिक रासायनिक वापर कमी होतो, मातीचे प्रदूषण रोखता येते,ही खते पर्यावरणीय हानी कमी करत पिकांचे उत्पादन वाढवतात. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीला अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना हवामान आधारित संवेदनशील शेती पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याच अनुषंगाने सरकारकडे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना अनुदान देण्याची मागणी आज संसदेत केली.
संसदेच्या पाचही अधिवेशनामध्ये शंभर टक्के उपस्थित राहणारा, प्रत्येक सभा आणि बैठकीमध्ये सभागृहामध्ये उपस्थित राहणारा खासदार म्हणून ओळख निर्माण करण्यात अनुप धोत्रे यशस्वी ठरले आहे.
प्रश्न उत्तर काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न, विमानतळाचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न, शिक्षा संबंधी प्रश्न वेगवेगळ्या विभागाच्या प्रश्न उत्तर तासांमध्ये भाग घेऊन आपल्या मतदारसंघातील समस्या प्रखरपणे मांडण्यात खासदार धोत्रे यशस्वी ठरत आहेत. हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याचा परिचय कृतीने देऊन खासदार धोत्रे यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.