अकोला : दरवर्षीप्रमाणे मराठा नगर येथे अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळामध्ये नऊ दिवस गरबा आयोजित करण्यात आला. 500हून अधिक महिला आणि मुलींनी 9 दिवस गरबा रास खेळण्याचा आनंद घेतला .दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण स्पर्धा ठेवण्यात आली होती.या मध्ये 100 हून अधिक लहान मुलींना गिफ्ट देण्यात आले. 30 स्पर्धकांमध्ये दिपाली वाकोडे उपविजेत्या तर अर्चना मोडक विजेत्या ठरल्या.
यावर्षी नवमीला साक्षात लक्ष्मीचे पूजन करून गरबा रास आरंभ करण्यात आला.यावेळी लक्ष्मीच्या रुपात कु.गिरिजा विशाल नकास्कर हीचे पूजन करून गरबा रास ला सुरुवात करण्यात आली.
यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती सुहासिनीताई धोत्रे, सौ मंजुषाताई सावरकर, अर्चना ताई शर्मा, सौ वैशालीताई शेळके, सौ सुनीता ताई अग्रवाल, सौ चंदाताई शर्मा, सौ सारिका ताई जयस्वाल, आरती ताई घोगलिया प्रामुख्याने उपस्थित होत्या. सौ सुहासिनी ताई धोत्रे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना नवरात्रात कचरा बाहेर न फेकण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे संचालन सौ अलका जैन यांनी केले .परीक्षक म्हणून मोक्षा शहा वंदना भाटिया आणि वानश्री व्यास या होत्या .
या कार्यक्रमाचे आयोजन अष्टभुजा नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष राहुल देशमुख आणि मंडळ सदस्य यांनी केले होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अष्टभुजा नवदुर्गा महिला मंडळाने अथक परिश्रम घेतले
आभार प्रदर्शन सौ निकिता राहुल देशमुख यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या