अकोला : स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात 01 ऑक्टोबर 2025 रोजी गप्पी मासे पाळा हिवताप टाळा हा जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आला. सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सुधीर चव्हाण यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना , डासांमुळे मलेरिया,डेंग्यू, चिकनगुनिया चा प्रादुर्भाव कसा होतो व यावर प्रतिबंधात्मक उपाय कसे करावे हे सांगितले. गप्पी मासे या डासांना गिळंकृत करतात. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने गप्पी मासे समतोल राखतात, त्यामुळे गप्पी मासे पाळण्याचे आवाहन करण्यात आले. शासकीय रुग्णालयात तसेच शासकीय उद्यानात गप्पी मासे उपलब्ध असून मोफत नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ करावे. छतावरील पाण्याची टाकी स्वच्छ करावी, कुंड्यांमधील पाणी काढून टाकावे व एक दिवस कोरडा पाळावा असे आवाहन केले.
आरोग्य सहाय्यक आर जी नागरे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. आरोग्य कर्मचारी पी एम पवार यावेळी उपस्थित होते. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एम भिसे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर अर्चना पोटे यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या