शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य विषयक जनजागृती

VISHAL PURANDARE
By -
0

 


अकोला : स्थानिक शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात १५ सप्टेंबर रोजी कनिष्ठ  आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. आर.एम. भिसे अध्यक्ष म्हणून लाभले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अनुजा देशमुख आरोग्य अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला व माधुरी एडणे, समुपदेशक जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला यांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाचे प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले.  यावेळी बोलताना डॉ. अनुजा देशमुख यांनी आरोग्य संदर्भात कशी काळजी घ्यावी व संतुलित आहार कसा असावा हे सांगितले. दैनिक दिनचर्या कशी असावी, विद्यार्थ्यांनी स्वच्छ व निरोगी शरीर कसे ठेवावे याविषयी सुद्धा माहिती दिली. समुपदेशक माधुरी एडणे  यांनी एड्स विषयी जनजागृती केली. मुलांकडून वाढत्या वयामध्ये चुका होतात आणि विद्यार्थीदशेत अशा चुका होऊ नये याची जाणीव करून दिली. नंतर अध्यक्षांचे भाषण झाले. 


अध्यक्षांनी भाषणात आरोग्य धनसंपदा असल्याचे पटवून दिले आणि आरोग्याचे महत्त्व सांगितले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत प्रमुख उपस्थिती डॉ. महेश इन्नाणी व सुरक्षा पेठे, औषधी निर्माण अधिकारी आणि वर्षा उके सिस्टर उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी चांगले स्वास्थ आणि हायजिन कसे मेंटेन करायचे व औषधीचे फायदे व काळजी कशी घ्यावी हे सांगितले. संचालन प्राध्यापिका रोहिणी भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन  प्रा. राधा रिंढे यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)