अकोला : विविध मान्यवरांच्या भेटीमुळे डेल्टा टीव्हीएस शोरूम गणेशोत्सव मंडळ सध्या चर्चेत आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक येथील श्री गणेशाच्या दर्शनाला पोहोचले. त्यांनी यथासांग पूजन करून श्री गणेशाची महाआरती केली. यावेळी सिंधी कॅम्प पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री केदारे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक हरिशभाई आलिमचंदानी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कमल आलिमचंदानी, संदीप आलिमचंदानी यांच्यासह कुटुंबातील सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या