मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

अकोला शहरात 4 हजार जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा ?

 




अकोला : शहरात 4000 जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा असल्याची चर्चा आहे. घोटाळ्याच्या तपासात "बनवाबनवी" सुरू असल्याने भारतीय जनता पार्टीची बुलंद तोफ किरीट सोमय्या अकोल्यात धडकणार आहेत.


या गुन्ह्याच्या तपासासाठी SIT नियुक्त करावी या मागणीसाठी उद्या गुरुवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वा. रामदासपेठ पोलिस स्टेशन अकोला येथे येणार आहे. विशेष म्हणजे आधार कार्ड वर जन्मतारीख एक व जन्म प्रमाणपत्रावर दुसरीच तारीख असलेल्या शंभर लोकांची यादी यावेळी किरीट सोमय्या सादर करणार आहेत.

टिप्पण्या