अकोला : गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालयात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. या अंतर्गत आज अन्नदान करण्यात आले तसेच 101 वेदपाठी ब्राह्मणांनी सामूहिकरीत्या गणपती आवर्तन, अभिषेक, भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय , विष्णुसहस्त्रनाम पाठ केले. भारतीय जनता पार्टी कार्यालयात मातृशक्तीच्या साक्षीने मंत्राचा जयघोष करण्यात आला.
यावेळी महाआरती आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील , राजेश चौधरी, अनिता चौधरी, संतोष डोंगरे, जानवी डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आली.
ज्यावेळी यज्ञेश जोशी, मृणाली मुक्तेश्वर कुलकर्णी, वेदश्री जोशी, अंजली देशमुख, सुभाष आंबेकर, अर्चना कैलास जाधव, मनोहर कुलकर्णी, दिनेश पांडे, मोहन जोशी, सतीश जोशी,कोकीलाताई फुटाणे यांनी विशेष पूजा अर्चना केली. यजमान म्हणून राजेश चौधरी, अनिता राजेश चौधरी, संतोष डोंगरे, सौ जानवी डोंगरे यांनी सतत तीन तास जय गजानन श्री गजानन नामस्मरण केले.
त्यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण पंचभाई, सौ मेघनाताई पंचभाई यांनी सुद्धा विशेष पूजा केली. यावेळी अण्णासाहेब कुलकर्णी, संदीप राठोड, दिलीप नायसे, सुरेश वानखडे, भूषण सारसे,कमलेश अहिर, विजय तोष्णीवाल, केतन अग्रवाल,सजय गोडफोडे, सुरेश वानखडे मोहम्मद शफर, माधव मानकर गिरी शजोशी, नितेश पाली, एडवोकेट देवाशिष काकड, रमेश अल्करी उपस्थित होते.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे विजय अग्रवाल जयंत मसने यांच्या मार्गदर्शनात महानगरात विविध कार्यक्रम सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या