अकोला : शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला, महाराष्ट्र इंग्लिश टीचर असोसिएशन अकोला जिल्हा व श्री शिवाजी हायस्कूल, टाऊन ब्रँच अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील गट ‘अ’ मध्ये इयत्ता 7 वी मधील विद्यार्थी अद्वैत प्रविण गायकवाड व गट ‘ब’ मधून इयत्ता 9 वी मधील प्रणव सतीश नवले या दोघांनीही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व शाळेच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा वाढविला. स्पर्धेतील विजेत्यांना शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले.
यासाठी या दोन्ही विद्यार्थ्यांना रेणुका भाले व शितल समीर थोडगे या शिक्षिकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य अनघा देव, शाळा समिती सदस्य यांनी व बालशिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद यांनी भरभरून कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या