जेजुरीची झलक, मातीचा मल्हार गणपती

VISHAL PURANDARE
By -
0

  

सुरभी व अभिषेक दोडके 

यांची आकर्षक सजावट

 





अकोला – गणेशोत्सवासाठी विविध मंडळे आणि घरगुती गणेशभक्त आपल्या श्रद्धा व कल्पकतेने सजावट करतात. यंदा अकोल्यातील सुरभी दोडके यांनी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेली गणेशसजावट विशेष आकर्षण ठरत आहे.



किल्ल्यासारख्या भव्य बांधकामात विराजमान गणेशमूर्ती हा सजावटीचा मुख्य केंद्रबिंदू आहे. किल्ल्याच्या भिंतींवर काळ्या दगडी वीटांची नक्षी, बुरुजांवर पहारेकरी, तर प्रवेशद्वारावर लखलखणारा “जय मल्हार” फलक – पाहणाऱ्यांना थेट जेजुरीतील खंडोबाची आठवण करून देतो. किल्ल्याच्या वरच्या भागात संत गजानन महाराजांची मूर्ती वृक्षांच्या छायेखाली विराजमान आहे. पार्श्वभूमीत उगवता सूर्य आणि आकाशात उडणारे पक्षी सजावटीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्पर्श देतात.



ही सजावट दोन दिवसांत सुरभी दोडके यांनी साकारली असून, त्यांच्या संभाजीनगर येथील भाऊ अभिषेक दोडके यांनी त्यांना मदत केली. “ही केवळ सजावट नसून भक्तिभाव, पराक्रम आणि अध्यात्म यांचा संगम आहे,” असे सुरभी यांनी सांगितले. मातीपासून तयार केलेल्या “मल्हार गणपती” मुळे या सजावटीला ऐतिहासिक आणि धार्मिकतेची आगळीवेगळी छटा लाभली आहे. किल्ला, गणेश, संत गजानन महाराज आणि जय मल्हार या चार प्रतीकांचा सुंदर संगम भाविकांना भारावून टाकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)