श्री शिवाजी महाविद्यालयात ए आय कार्यशाळा उत्साहात संपन्न

VISHAL PURANDARE
By -
0

 



अकोला : श्री शिवाजी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स जूनियर कॉलेज, अकोला येथे "आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence)" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती.


कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. एम. भिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.मुख्य वक्ता म्हणून शांतनु गजानन जवंजाळ उपस्थित होते, त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे विविध पैलू, त्याचा शैक्षणिक क्षेत्रात उपयोग, तसेच भविष्यातील संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



मुख्य वक्त्यांनी AI चा व्यवहारातील उपयोग, शिक्षण पद्धतीत त्याचा समावेश कसा करता येईल, आणि याच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी कसे बनवता येईल यावर उदाहरणांसह माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्राचार्य महोदयांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.तसेच कार्यक्रमाच्या आयोजिका प्रा. एस. एच. मळसणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



 प्रास्ताविक डॉ. अर्चना पोटे, संचालन डॉ. सोनाली चापके आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका रोहिणी भालेराव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)