मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

काटी पाटी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव द्या आ. रणधीर सावरकर यांनी ठणकावले

 



अकोला : विदर्भात विविध सिंचन प्रकल्पासाठी यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी करण्यात आल्या. तसाच काहीसा प्रकार काटी पाटी येथील प्रकल्पा संदर्भात होत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसहित आमदार रणधीर सावरकर यांनी लघु पाटबंधारे विभागात धडक दिली. आधी शेतकऱ्यांच्या जमिनीला समाधानकारक भाव द्या नंतर अधिग्रहण करा अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली.


शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये शेतकरी हा देशाचा आत्मा असून शेतकऱ्याच्या जमिनीला योग्य तो मोबदला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार तयार असताना अधिकाऱ्यांनी आठ काठी आणू नये असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आणि ग्रामस्थांच्या व महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या पाठीशी आहेत. अधिकाऱ्यांनी नियमानुसार कामे करून योग्य तो मोबदला देण्यासंदर्भातला प्रस्ताव शासनाकडे पाठवावा व शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन कारवाई करावी अशी निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवा असे ही बजावले.

https://youtube.com/@vishalpurandare-l1e?si=VeKbWHpdmzonxc85

  शेतकऱ्यांना मोबदला वाढवून देण्यात यावा याकरिता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबई येथे महसूल विभागात बैठक आयोजित केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. यावेळी संतोष शिवरकर, राजेश बेले, अंबादास उमाळे, विवेक भरणे, व काटी पाटी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या