मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

 --- बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आमदार रणधीर सावरकर यांची पाहणी अकोला, दि. 05 ऑगस्ट 2026 : अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी मा. आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर यांनी परिसरातील नागरिकांसोबत जाऊन केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी पंकज वाडीवाले, राजू गमे, सुबोध गवई, बंटी मांगे, भटकर, देशमुख, जयकुमार ठोकळ, प्रवीण हगवणे, महेंद्र काळे, ढंगारे , गिरी, रवी काटे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सावरकर म्हणाले   "अकोला तालुक्यातील बोरगाव मंजूला पंचक्रोशीत महत्त्वाचे स्थान आहे. या भागातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष निधी उपलब्ध करून मी या ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू केले होते. आज ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंचक्रोशीतील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी हाच उद्देश आहे." "एक सुरेख आणि दर्जेदार रुग्णालय या भागातील नागरिकांना मिळावे यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर...

डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा

 




अकोला - स्थानिक शिवसेना वसाहत येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला आपला माणूस डॉ अशोक ओळंबे, गजानन चव्हाण, डॉ संजय ढोरे, वैशाली दीदी, रुपाली दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन २९ वर्षापासून समाजसेवक गणेश पोलाखडे व त्यांचे पुत्र सागर पोलाखडे यांच्या वतीने करण्यात येते. 



याप्रसंगी भारत मातेचे पूजन करून झेंडा वंदन प्रजापिता ब्रह्मकुमारी च्या वैशाली दीदी व आपला माणूस डॉ अशोक ओळंबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला गणेश मानकर, संतोष चाटी, गजानन चव्हाण, डॉ मधुकर सोनारगण संतोष काटे, डॉ संजय ढोरे, श्री तिवारी राजूभाऊ, संतोष पोंधे, सोनू डांगे, एकनाथ ढवळे, संतोष राऊत, कृष्णा महाजन, रामभाऊ लढाळ, शाहू महाराज, मदनकर काका, धनंजय बुलकडे, मयूर सुलताने, धनगर काका, मनीष अग्निहोत्री, स्वराज मंडळे, सोनू खारोडे, अमोल ढवळे, प्रमोद मराठे, आनंद वाशीमकर, विकी मुळे, गणेश देशमुख, रूपाली दीदी,श्रीनिवास ताई, सागर खारोडे, ओम वानखडे, राजेश्वर वानखडे, गणेश अनासणे, राधेश्याम चहा जगुणे, हर्षल चांभारे, रवी सोनाग्रे उपस्थित होते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट