अकोला, दि 15 : स्थानिक श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रा. कु. दिपाली बापूराव चिरंगे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने वाणिज्य शाखेची सर्वोच्च पदवी पीएच.डी. बहाल केली.
प्रा. दिपाली चिरंगे यांनी वाणिज्य विद्याशाखेअंतर्गत 'पश्चिम विदर्भातील आदिवासी महिलांच्या आर्थिक विकासात बचत गटाचे योगदान - एक विश्लेषणात्मक अध्ययन’ या विषयावर संशोधनात्मक प्रबंध श्रीमती आर डी जी महिला महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॅा.ए.बी. पांडे यांच्या मार्गदर्शनात सादर केला होता.
प्रा.दिपाली चिरंगे ह्या मूळच्या चिरंगवाडी ता. उमरखेड येथील रहिवासी असून त्या श्रीमती आर डी जी महाविद्यालयातुन बी.कॉम मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून मेरिट आल्या होत्या तसेच प्राध्यापक पदाची राज्य पात्रता परीक्षा (सेट) व राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ह्या दोन्ही परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या आहेत. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स मघ्ये शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॅा रुमाले, प्रोफेसर डॅा एम आर इंगळे, डॅा गणेश खेकाळे, डॅा मनोहर वासनिक, प्रा प्रकाश गवई, प्रा राहुल माहुरे, प्रा ॲड आकाश हराळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या