अकोला दिनांक 15 : दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल, याच्यापेक्षा मोठं चूप, याच्यापेक्षा मोठा धोका कोणता असू शकत नाही. बिना आजादी बिना ढाल जर स्वातंत्र्य मिळाले तर भगत सिंग, राजगुरूं, सुखदेव, चाफेकर बंधु, लोकमान्य टिळक, योगी अरविंद, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, अल्लूरी सीताराम राजू, या सारख्या असंख्य क्रांतिकारकांनी शस्त्र उचलले त्यांचं योगदान नाही? त्यांच्या योगदानाच्या बद्दल प्रश्न नाहीये. फक्त त्यांच्यामुळे आझादी मिळाली हे धादांत असत्य आहे. हे अर्धसत्य आहे, असा प्रहार संस्कृती संवर्धन समिती, अकोला यांच्या वतीने आयोजित अखंड भारत संकल्प दिनानिमित्त जाहीर व्याख्यानात सुनील देवधर यांनी केला.
खंडेलवाल भवन येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्रमुख वक्ते सुनील देवधर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश संतानी, समिती अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, स्वागत समिती अध्यक्ष अरविंद देठे उपस्थित होते.
“अखंड भारत – संकल्प ते साकार” या विषयावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संयोजक – पूर्वोत्तर भारत संपर्क प्रकोष्ठ व माजी राष्ट्रीय संयोजक सुनील देवधर यांचे परखड विचार ऐकण्यासाठी अकोलेकरांनी तुफान गर्दी केली होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये सगळ्यात मोठे योगदान आणखीन एका महापुरुषाचे आहे, तो महापुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या लक्षात ठेवले पाहिजे. पुढे त्यांनी आपल्या उद्बोधनात अखंड भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, फाळणीनंतरच्या राजकीय घडामोडी, सांस्कृतिक एकात्मतेचे महत्त्व आणि भविष्यातील भारताच्या पुनःएकत्रीकरणाची शक्यता या विषयांवर सखोल विवेचन केले. “ भारताची खरी शक्ती त्याच्या सांस्कृतिक मुळांमध्ये आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून आपले योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत व परिचय सोनल ठक्कर यांनी, तर प्रास्ताविक प्रा. नितीन बाठे यांनी केले. रश्मी कायंदे यांनी अखंड भारत निबंध स्पर्धेबाबत माहिती देत विजेत्यांची घोषणा केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केली. विनय जकाते यांनी वैयक्तिक गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे संचालन चेतन काळे यांनी केले. महेश जोशी यांनी “वंदे मातरम्” गायले. संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने समीर थोडगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून, अशा उपक्रमांद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
निबंध स्पर्धेचे विजेता
अ गट - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकांचे योगदान
प्रथम :- ध्रुवी उ. कळकर्णी - खंडेलवाल इंग्लिश प्राइमरी स्कूल
द्वितीय :- तेजस्विनी देशमुख विवेकानंद प्रायमरी स्कूल
तृतीय :- भावेश शर्मा भारत विद्यालय
गट ब – भारताच्या फाळणीची शोकांतिका
प्रथम :- समृद्धी पांडव, विवेकानंद प्रायमरी स्कूल
द्वितीय :- समृद्धी ग. थोरात, बाल शिवाजी
तृतीय :- भाविका सोनटक्के, राजेश्वर कॉन्व्हेंट
खुला गट - अखंड भारताचा मागोवा
प्रथम :- अपेक्षा यो. आवळे बाल शिवाजी
द्वितीय :- सोनाली सोनवणे संताजी इंग्लिश स्कूल
तृतीय :- पूजा रमेश भाकरे संताजी इंग्लिश स्कूल
निबंध स्पर्धेसाठी विशेष सहकार्य मधुरा भारतीय, महेश ठोके, सुहास देशपांडे यांचे लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या