स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे विविध समित्यांचे गठन

VISHAL PURANDARE
By -
0

 


अकोला - महाराष्ट्र शिक्षण विभागातर्फे शाळास्तरावर विविध समित्या स्थापन करण्याचे आदेश सर्व शाळांना देण्यात आले आहेत. या आदेशानुसार स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला कॉलोनी येथे माता पालक संघ , विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती, इत्यादी समित्यांची स्थापना करण्यात आली. 


    शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली शाळेत समिती स्थापनेसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत इच्छुक पालकांना आमंत्रित करून त्यांना या समितीची कार्यप्रणाली व महत्त्व विषद करण्यात आले. यावेळी माता पालक संघ,विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समितीच्या अध्यक्ष, सचिव व सदस्यांची निवड करण्यात आली.


 सदर समिती स्थापनेसाठी मा. नगरसेवक सागर शेगोकार, शाळेचे शाळा व्यवस्थापन अधिकारी सुमित बोकाडे, मातापालक संघ सचिव कविता राठी, सखी सावित्री समिती अध्यक्ष विद्या अवचार , समिती अध्यक्षा मुख्यध्यापिका डॉ. श्वेता दिक्षित व विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमुख शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख स्वप्नील अंभोरे, माजी विद्यार्थी रवी यादव, मानसोपचार तज्ञ डॉ.अनुश्री बाहेती, सखी सावित्री समितीच्या प्रमुख शिक्षिका रुपाली वाहुरवाघ,माता पालक संघ समितीच्या प्रमुख रश्मी बोकरे इत्यादी उपस्थित होते. बैठकीत सर्व समितिची कार्यप्रणाली, रचना सांगून अध्यक्ष, सचिव व सदस्य निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)