अकोला : सार्थक वक्तृत्व अकॅडमी म्हणजे समाज प्रबोधनाचे केंद्र आहे असे रोखठोक विचार डॉक्टर वासुदेव गोलाईत यांनी व्यक्त केले. स्थानिक गड्डम प्लॅाट स्थीत सार्थक वक्तृत्व अकॅडमी भाषण कला प्रशिक्षण केंद्र, अकोला च्या वतीने आयोजित वक्तृत्व प्रशिक्षणपूर्ती समारंभ कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॅा मनोहर वासनिक, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रकाश गवई, प्रा. राहुल माहुरे , प्रा ॲड आकाश हराळ उपस्थीत होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक अकॅडमीचे संचालक विशाल नंदागवळी यांनी केले.
पुढे बोलतांना डॅा वासुदेव गोलाईत म्हणाले की, मानवी इतिहासात, विचारांचे आदानप्रदान आणि जनमानसात क्रांती घडवून आणण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे वक्तृत्व. शब्दांच्या सामर्थ्याने समाजमन जागृत होते, रूढी-परंपरांना आव्हान दिले जाते आणि प्रगतीची नवी दिशा निश्चित होते. महाराष्ट्राला तर समाजसुधारकांची आणि ओजस्वी वक्त्यांची गौरवशाली परंपरा लाभली आहे, ज्यांनी आपल्या वाणीने समाजाला प्रबोधनाचा मार्ग दाखवला. आजच्या काळात, याच परंपरेचे आधुनिक स्वरूप म्हणून 'सार्थक वक्तृत्व अकॅडमी' समाजप्रबोधनाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
यानंतर प्रा. प्रकाश गवई, प्रा राहुल माहुरे, प्रा ॲड आकाश हराळ यांची समायोचीत भाषणे झाली. शिवकुमार ढोकणे,नलिनी वानखडे, अश्लेषा लिंगायत,शिलवंत शिरसाट,शुभम राऊत,साहिल नंदागवळी या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॅा मनोहर वासनिक यांनी सांगीतले की, वक्तृत्व अकॅडमी विद्यार्थ्यांना स्पष्ट, प्रभावी आणि आत्मविश्वासाने बोलण्याचे प्रशिक्षण देते. आवाजातील चढ-उतार, देहबोली, शब्दांची निवड आणि विषय मांडणी यांसारख्या तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करून त्या विद्यार्थ्यांना उत्तम वक्ता बनण्यास मदत करते. हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना सार्वजनिक विचारपिठावर सामाजिक विचार मांडण्यासाठी प्रोत्साहित करतो.
कार्यक्रमाचे संचालन कु. साक्षी तायडे
हिने तर आभार प्रदर्शन रोहन मोरडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजिंक्य धेवडे, विक्की मोटे, अमित लोंढे, आदित्य बावनगडे, शुभम गोळे, ॲड. वैष्णवी हागोणे, योगेश कोल्हे यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या