अकोला : आजच्या धकाधकीच्या काळात साधा सर्दी पडसा जरी झाला तरी, ताबडतोब बरे वाटावे म्हणून आपण ऍलोपॅथीकडे वळतो. परंतु होमिओपॅथी औषधाने स्वस्तात व कोणतेही साईड इफेक्ट न करता दुर्धर आजार देखील बरे होतात. अशा अनेक रुग्णांना अकोला येथील डॉक्टर संदिप चव्हाण यांनी रोगमुक्त केले आहे. 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन (World Homoeopathy Day)आहे त्यानिमित्त लिहिलेला हा विशेष लेख.
होमिओपॅथी सेंट्रल नर्व्हस सिस्टीम द्वारे कार्य करते तर ऍलोपॅथी इतर पचनसंस्थेतून. ऍलोपॅथी मध्ये साधारणता पथ्य पाळावे लागत नाही होमिओपॅथी मध्ये औषधासोबत पथ्य पाळावे लागतात. अनेक रुग्णांना वर्षानुवर्ष जुने आजार असतात. त्यांना क्रोनिक (chronic) आजार म्हणतात. असे अनेक रुग्ण ठणठणीत केल्याचे डॉक्टर संदिप चव्हाण यांनी सांगितले. पचन क्रिया बिघडल्यास अल्सरटीव्ह कोलाइटिस सारखे आजार होतात. यामध्ये खाल्ल्यानंतर काहीच पचत नाही. मात्र होमिओपॅथी मध्ये यावर उपचार आहेत. इतर ठिकाणी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा स्वस्त दरात नियमित औषध घेतल्यास होमिओपॅथी वरदान ठरू शकते.
कॅन्सर (cancer) सुद्धा बरा होतो
आपल्याला कॅन्सर झाला आहे हे लक्षात येताच होमिओपॅथी (homoeopathy) उपचार सुरू केल्यास कॅन्सर सुद्धा पूर्णपणे बरा करता येऊ शकतो असे डॉक्टर संदिप चव्हाण यांनी सांगितले. मुळव्याध सुद्धा शस्त्रक्रिया न करता अल्पदरात पूर्णपणे बरा करता येतो. होमिओपॅथी मध्ये नेहमी संशोधन करून औषध (medicine) तयार होत राहतात. सिद्धांतांवर आधारित औषधी आहेत. होमिओपॅथी मध्ये उपचारासाठी खूप वेळ लागतो असा गैरसमज आहे. मात्र औषध जिभेवर टाकल्याबरोबर काही सेकंदातच पुढील कार्य सुरू होते.
औषधांचा अतिरेक हानिकारक
पुढे बोलताना डॉक्टर चव्हाण म्हणाले की, कोरोना काळात ज्यांनी औषधांचा अतिरेक केला त्यांना आज विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. आपल्या मनाने औषध घेऊ नका. अनुभवी डॉक्टर कडून औषध घ्या. ज्याप्रमाणे वारंवार मद्य प्राशन केल्याने किडनी खराब होते त्याचप्रमाणे औषधांचा अतिरेक केल्याने देखील किडनीवर दुष्परिणाम होतात.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या