शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रयत क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांची वज्रमूठ

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0



अकोला : विदर्भात बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना अनेक वेळा नापिकीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रयत क्रांती संघटनेची विदर्भस्तरीय बैठक  दिनांक 6 एप्रिल संतनगरी शेगांव येथे रामनवमीच्या दिवशी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली होती. यावेळी विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वज्रमूठ बांधली.

रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दिपकभाऊ भोसले, रयत क्रांती पक्षाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुहास पाटील. राज्य युवा अध्यक्ष अरविंद पाटील, राज्य युवती प्रदेशाध्यक्ष प्रियाताई राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. बैठकीत विदर्भातील रयत क्रांती संघटनेच्या नियुक्त्या करण्यात आल्या , तसेच या बैठकीला शेतकरी, शेतमजुर, व शेतकरी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या , रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दिपकभाऊ भोसले, रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष प्रा. सुहास पाटील , युवती प्रदेशाध्यक्ष प्रियाताई राऊत, विदर्भ अध्यक्ष आशिषभाऊ वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व रयत क्रांती संघटनेच्या पुढील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविली विशेष या बैठकीला शेतकरी महीला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)