मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध - डॉक्टर किशोर कुचके

 



अकोला : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या निराकरणासाठी आपण कटिबद्ध राहू असे मनोगत डॉक्टर किशोर रामराव कुचके यांनी व्यक्त केले. बाळापुर तालुका अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.

अकोला जिल्हा ग्रामीण मंडळ निवडणूक सुरू आहे. बाळापुर ग्रामीण निवडणूक अधिकारी भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर शंकरराव वाकोडे यांनी किशोर कुचके यांच्या नावाची घोषणा केली. 

यावेळी जिल्हा भाजपा सरचिटणीस माधव मानकर, शंकरराव वाकोडे,गणेश राव तायडे, अमोल साबळे, राजू नागमते, आनंद हरणे, गजानन आवचार, योगेश पटोकार,शाम माळी, नरेश फिरंगी, प्रमोद धनोकार, अमोल राऊत, आदि पदाधिकारी उपस्थित होते ‌.

कार्यकर्त्यांचा आशीर्वाद, ज्येष्ठांचा अनुभव लक्षात घेऊन आपण पक्ष विस्तारासाठी कार्यरत राहू. पक्षाने दिलेली जबाबदारी ही व्यवस्था असून शत प्रतिशत भाजपाचा विस्तार करू असा विश्वास किशोर कुचके यांनी व्यक्त केला. या तालुक्यातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्ष विस्तारासाठी काम केले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री एडवोकेट आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे , आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, तेजराव थोरात, मनोहर राहणे रामदास लांडे यांच्या मार्गदर्शनात आपण कार्यरत राहू असे यावेळी त्यांनी सांगितले.

टिप्पण्या