अकोला : जसपाल सिंह नागरा यांनी नॅचरोपॅथीच्या माध्यमातून संतुलित आहाराचा सल्ला देत शेकडो रुग्णांना बरे केले. अनेक रुग्णांना कॅन्सर पासून मुक्त केले. कुठल्याही औषधाशिवाय आज हे रुग्ण आनंदी जीवन जगत आहेत. नुकतीच जसपाल सिंह नागरा यांच्या कडून माहिती जाणून घेतल्यानंतर डॉ. विश्व रूप राय चौधरी यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
नॅचरोपॅथीच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपचार पद्धती बद्दल सखोल चर्चा करण्यासाठी जसपाल सिंह नागरा नुकतेच दिल्ली येथे गेले. यावेळी त्यांचे नातू राजवीर सिंह नागरा त्यांच्यासोबत होते.तब्बल दीड तास त्यांनी विश्वरूप राय चौधरी यांच्याशी सखोल चर्चा केली. यावेळी चौधरी यांनी भोजन ही दवा है अशा शब्दात नॅचरोपॅथीचे महत्त्व सांगितले.
प्रत्येकाने आहारामध्ये ग्रीन सलाद, फळे व अंकुरित कडधान्य यांचा समावेश करावा असे चौधरी म्हणाले. यावेळी चौधरी यांनी नॅचरोपॅथीचे सखोल ज्ञान असलेले डी आय पी डायट नावाचे पुस्तक जसपाल सिंह नागरा यांना भेट म्हणून दिले. फास्ट फूड, वेळी अवेळी भोजन, झोपण्याची अनिश्चित वेळ यामुळे विविध व्याधी उद्भवत असल्याचे जसनागरा यांनी सांगितले.