अकोला : पाकिस्तानच्या इशाऱ्यावर दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे धर्म विचारून हिंदू धर्मातील 28 लोकांची हत्या केली याचा बदला मोदी सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच महाराष्ट्रातील साडेचारशे पर्यटक व अकोला जिल्ह्यातील 53 पर्यटक सुखरूप असून त्यांना दोन दिवसात अकोल्यात आणण्यात येईल असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
स्थानिक महाराणा प्रताप चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने 28 शहिदांच्या श्रद्धांजली व पाकिस्तानच्या विरोधात निदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहीद झालेल्या 28 पर्यटकांना 101 दिवे लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी खासदार अनुप धोत्रे म्हणाले की जम्मू काश्मीर मध्ये दहशत निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव कधीच यशस्वी होणार नाही.
महाराष्ट्रातील सहा शहिदांसह 28 लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अकोला जिल्ह्यातील 53 पर्यटक सुरक्षित असून लवकरच अकोल्यात येणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर पाटील होते तर जयंतमसने , डॉ.अभय जैन, डॉ.किशोर मालोकार, समीक्षा धोत्रे, माधव मानकर एडवोकेट देवाशिष काकड, सजय गोटफोडे, गिरीश जोशी, चंदा शर्मा कृष्णा शर्मा, तुषार भिरड, सुमन गावंडे सारिका जयस्वाल वैशाली शेळके सतीश ढगे, नितीन राऊत, रमेश अल्करी सिद्धार्थ शर्मा, रमेश करिअर अर्चना चौधरी, दीप मनमानी विनोद मनवानी अजय शर्मा रंजीत खेडकर नाना कुलकर्णी किशोर कुचके शितल जैन अभिजीत बांगर विपुल घोगरे, चंदा ठाकूर निलेश काकड जानवी डोंगरे देशमुख जितेंद्र देशमुख राजेंद्र गिरी प्रकाश धोगलीया, अमोल गीते पप्पू वानखडे, दिलीप नायसे, संतोष डोंगरे, संतोष पांडे, विकी ठाकूर, उमेश श्रीवास्तव, संदीप गावंडे, शोभ राज राजपाल हिरालाल कुपलानी, मनीष बाचुका , कन्हैया आहुजा, उकडराव सोनवणे भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.