आगे बढो ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खा. अनुप धोत्रे यांना लाभला आशीर्वाद

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

 



अकोला : आपल्या मतदारसंघातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी. शेतकरी संपन्न व्हावा. नवीन उद्योग धंद्यांची उभारणी, रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टीने खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी 'आगे बढो' अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठीवर थाप दिली.

याप्रसंगी खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. अकोला लोकसभा मतदारसंघातील 17 लाख मतदारांच्या वतीने आज पंतप्रधान मोदी यांचा सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती समीक्षा धोत्रे, कुमारी यशिका, रणविजय, राजनंदनी यांनी सुद्धा पंतप्रधानांचा आशीर्वाद घेतला. यावेळी पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अकोला लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी कुमारी यशीका ,रणविजय, राजनंदनी यांच्यासह समीक्षा धोत्रे यांच्याशी कौटुंबिक चर्चा केली.

महाराष्ट्राच्या महायुतीच्या कारभाराचा बद्दल सुद्धा माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद अकोला लोकसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत खासदार धोत्रे यांनी व्यक्त केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)