अकोला : दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे Anup Dhotre शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. नवीन युनिट्स उभारण्यासाठी स्वतःची जमीन आवश्यक आहे का? सरकार दीर्घकालीन भाडेपट्टीला परवानगी देण्याचा विचार करत आहे का असे प्रश्न विचारून मंत्री महोदयांना उत्तर देण्यास त्यांनी भाग पाडले.
खासदार धोत्रे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री Minister महोदय म्हणाले की,
ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत सर्वसामान्यांना नवीन उद्योग टाकायला आता स्वतःच्या जागेची गरज नाही. या योजनेत जमिनीशी संबंधित कोणताही पूर्वनिर्धारित निकष नाही. तसेच, जमिनीच्या मालकीबाबत कोणताही अट नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी मंजूर झाल्यानंतर अर्जदारांना लाभ दिले जाणार आहेत.
विदर्भातील जमीन कोरडवाहू आहे.शेतीचे पिकणे निसर्गाच्या भरवशावर आहे. शेतकरी नेहमीच अडचणीत असतात ही बाब लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना विविध योजनांचा फायदा करून देण्यासाठी खासदार अनुप धोत्रे संसदेत ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या