संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे कोण आहेत डॉक्टर शैलेंद्र दुबे?

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

 




अकोला : महाराष्ट्रातील अकोला (akola) शहरात डॉक्टर शैलेंद्र दुबे गेल्या 23 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या सकारात्मक लेखन शैलीने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मुंशी प्रेमचंद, जयशंकर प्रसाद, महादेवी वर्मा, डॉ.भीष्म साहनी यांच्या साहित्याचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला आहे. हिंदी साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल देत महाराष्ट्र शासनाने त्यांना साहित्य अकादमी (sahitya akadami) पुरस्काराने पुरस्कृत केल्यानंतर डॉक्टर शैलेंद्र दुबे यांचे नाव प्रामुख्याने प्रकाशझोतात आले आहे.

 


महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे मंगळवार, १८ मार्च रोजी रंग शारदा सभागृह, वांद्रे, मुंबई येथे पुरस्कार (puraskar) सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात डॉ. शैलेंद्र दुबे यांना त्यांच्या 'समकालीन हिंदी पत्रकारिता: भाषा और शिल्प' या पुस्तकासाठी 'बाबुराव विष्णू पराडकर (पत्रकारिता - कला)'  प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.  डॉ.दुबे यांनी पत्नी बरखा यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला.डॉ.शैलेंद्र दुबे लोकमत समाचार (lokmat samachar) अकोला आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक आहेत हे येथे उल्लेखनीय !


 राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एड. आशिष शेलार, अमरजीत मिश्रा, हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. शीतला प्रसाद दुबे, उपाध्यक्षा सौ. मंजू लोढा, ज्येष्ठ पत्रकार विमल मिश्रा, प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी अनेक लेखक आणि शेकडो साहित्यप्रेमी सभागृहात उपस्थित होते. 


डॉ. शैलेंद्र दुबे यांचा परिचय


* एम ए हिंदी (बी.एड.) पीएचडी.


*  प्रख्यात हिंदी दैनिक लोकमत समाचार मध्ये गेल्या 23 वर्षापासून वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत.


* विविध धार्मिक सामाजिक संघटनांमध्ये योगदान


* विविध शैक्षणिक संस्थांमधील स्नातक,स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून मार्गदर्शन करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)