अकोला येथील दिव्यांग जलतरणपटूने राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

 


अकोला : रेशीम बाग मैदान नागपूर येथे दि.21 ते 23 मार्च 2025 या कालावधीत दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत जलतरण या प्रकारात मुलांनी दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य पदक पटकावले. 

यामध्ये 17 ते 21 या वयोगटात स्वर्गीय कन्नूभाई वोरा अंध विद्यालय मलकापूर अकोला ची विद्यार्थिनी सृष्टी सावळे हिने 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक पटकावले. 13 ते 16 या वयोगटात ज्ञानेश्वरी इंगळे 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक, 17 ते 21 या वयोगटात शिवम सरदार 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये रौप्य पदक तसेच कुणाल तेलगोटे यांनी 50 मीटर पोहणेमधे कास्य पदक पटकावले.

दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व स्वतंत्र अशी विशेष बॅच घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट यांचे मार्गदर्शन मिळाले व मास्टर पॉवर स्विमिंग क्लब चे संचालक योगेश अनंत पाटील(NIS. Coach)यांच्या मार्गदर्शनात स्विमिंग क्लबचे प्रशिक्षक दीपक सदांशिव, प्रमोद खंडारे,सुशील कांबळे, मोहील खरात, संदीप मेहेरे (क्रीडा तज्ञ), अभिषेक ताले,सतीश पाणझाडे, ज्योती पंपालिया, दिनेश वाघ, संतोष जगताप, चंचल महाजन, तुषार शेगोकार, विकी पवार, विनय तायडे, मनीषा वंजारी,कविता जावरकर यांनी सहकार्य केले. या सर्व मास्टर पावर स्विमिंग क्लबच्या प्रशिक्षक व लाईफ गार्डचे, विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)