https://tumchyasathich.blogspot.com/2025/01/blog-post_22.html
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा, परिसरात सुख समृद्धी, संपन्नता राहावी यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी कुंभमेळ्यात भेट दिली. यावेळी खा धोत्रे व त्यांच्या धर्मपत्नी समीक्षा धोत्रे यांनी गंगा स्नान केले. त्यानंतर उपस्थित नागा साधू व इतर महात्म्यांचे दर्शन घेतले.
प्रयागराज येथे कुंभमेळ्याच्या निमित्ताने आलेल्या
64 कोटी भाविकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनात उत्तम व्यवस्था करण्यात आली. गंगा यमुना सरस्वती नदीच्या संगमावर पंतप्रधान मोदी यांनी एकतेचा अनोखा मंत्र दिल्याची प्रतिक्रिया खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केली.
जातपात धर्मपंथ कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांना एकत्र आणणारा हा महोत्सव समाजासाठी दिशादर्शक ठरेल असेही ते म्हणाले.
या धार्मिक महोत्सवाच्या माध्यमातून सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांना कृतीने चोख उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. अकोल्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते दिवस रात्र प्रयागराज येथे सेवा देत आहे. याप्रसंगी अकोलेकरांच्या वतीने सेवा करणाऱ्या कार सेवकांचा त्यांनी सत्कार केला व त्यांच्याशी संवाद साधला.
भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा : समीक्षा धोत्रे
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात देशभरातून भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. ज्यांचे दर्शन देखील दुर्लभ आहे अशा संत महात्म्यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यामुळे भाविकांनी साधू, संतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा अशी विनंती खासदार अनुप धोत्रे यांच्या पत्नी समीक्षा धोत्रे यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील जवळपास तीन लाख पेक्षा जास्त नागरिक या कुंभमेळ्यात सहभागी झाले आहे.