आलेगाव प्रकरणात आमदार सावरकर यांच्या पोलीस विभागाला सूचना
अकोला : पातुर तालुक्यातील आलेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात व्यावसायिकावर गुन्हा दाखल केल्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची भेट घेतली. या प्रकरणी खरी माहिती घेऊनच पोलिसांनी कारवाई करावी, निर्दोष व्यक्तींवर अन्याय होता कामा नये असे स्पष्ट मत आमदार सावरकर यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील गुन्हेगारी, चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून याकडे पोलीस विभागाने लक्ष द्यावे अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या. आलेगाव प्रकरणात व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांशी चांगल्या पद्धतीने वागणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विरोधात संपूर्ण गाव जात- धर्म विसरून एकत्रित आला आहे. यावरून गुन्हा दाखल करण्याच्या मागे उद्देश काय असू शकतो याची प्रचिती येते असे मत आमदार सावरकर यांनी व्यक्त केले आहे. आलेगाव येथील ग्रामस्थांनी व्यापार बंद ठेवला, तसेच मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. या घटने संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी व निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करता येणार नाहीत तसेच पीडित व्यक्तीला सुद्धा न्याय मिळावा. या प्रकरणात खरी माहिती घेऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असे आमदार सावरकरांनी सांगितले. यावेळी आलेगाव घटने संदर्भात भाजपा शिष्टमंडळाने व्यापाऱ्यांची बाजू मांडली व न्याय देण्याची मागणी केली. यावेळी मा. महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने, शंकर वाकोडे, भिकाभाऊ धोत्रे, रमण जैन, चंद्रकांत अंधारे बबनदादा कालदाते गणेश ढोणे दिलीप काळपांडे,विनोद काठोळे,सखाराम लहमगे, शामराव कालदाते व गांवकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या