मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

दादा महाराज आवदे यांचे वयाच्या 101 व्या वर्षात पदार्पण

 



अकोला : श्री दत्त संप्रदायातील साधक व श्री गुरुचरित्राचे उपासक म्हणून प्रसिद्ध श्रद्धेय श्री बाळकृष्ण ( दादा) आवदे (Awade) यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली असून 11 जानेवारी 2025 रोजी ते 101 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्यात दत्त उपासना करणारा त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

तेल्हारा (Telhara) येथील श्री विष्णुदास महाराज यांचे ते अंतरंग शिष्य आहेत. सद्गुरु श्री विष्णुदास महाराज माहात्म्य व इतर एकूण १४ ग्रंथांचे लेखक असून ते पूर्वीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rss) जुने स्वयंसेवक आहेत. १९५० ते १९८५ पर्यंत त्यांनी तेल्हारा येथील सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा,येथे गणित (math) विज्ञानाचे (science) शिक्षक म्हणून सेवा दिली. त्यांनी मोठ्या प्रमाणात धार्मिक ग्रंथांचे लिखाण केले, मात्र सर्व साहित्य ते विनामूल्य वितरित करतात. त्यांची प्रकृती आजही उत्तम असून नित्यनियमाने त्यांची उपासना सुरू आहे. त्यांना,११जानेवारी २०२५ रोजी १०१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या