गांधीग्राम येथील शंभर वर्ष जुना ब्रिटिश कालीन पुल तोडला

VISHAL PURANDARE
By -
2 minute read
0


आ. रणधीर सावरकर यांनी 100 कोटींचा निधी खेचून आणला




अकोला : गांधीग्राम येथील शंभर वर्ष जुना ब्रिटिश कालीन पुल शिकस्त झाल्याने वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तांत्रिक समितीने दिला. याची तत्कालीन खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीने दखल घेत ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून नवीन पुलाच्या निर्मितीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. त्या दृष्टीने जुना पूल पाडण्यात आला. यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, मा. महापौर विजय अग्रवाल यांनी पाहणी केली.

 अवघ्या दोन दिवसात अकोट पंचक्रोशीतील नागरिकांना रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली. अकोट अकोला मेमो ट्रेन सुरू केली. त्याचप्रमाणे बारा वर्षांपासून गोपालखेड येथे पूर्णा नदीवरील पुलाचे काम थांबले होते. 28 शेतकऱ्यांशी संवाद साधून तातडीने चार कोटी चा रस्ता तयार केला. नवीन पुलाच्या निर्मितीसाठी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून 99 कोटी रुपये मंजूर करून आणले. 




आमदार सावरकर यांनी आपले सहकारी आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकले, युवा खासदार अनुप धोत्रे यांना सोबत घेऊन या रस्त्याला गती देण्याचे काम केले. श्रावण महिन्यात पूर्णा नदीच्या पाण्याची कावड राजेश्वराला जल अभिषेकासाठी नेणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सुंदर घाट निर्माण करण्याच्या दृष्टीने आदेश दिले. व त्या कामाची प्रगती पाहण्यासाठी आज खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

याप्रसंगी अकोल्याचे माजी महापौर विजयजी अग्रवाल आणि जयंतराव मसने यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्याकडे कावड व पालखी महोत्सवावेळी शिवभक्तांच्या सोई साठी योग्य व्यवस्था करण्यात यावी या करता पाठपुरावा केला. त्यामुळे नदीपात्रात शिवभक्तांना उतरण्यासाठी ०८ मीटर रुंदीचा पायऱ्या व विस्तृत घाटाचे निर्माण कार्य प्रगती पथावर आहे.यामुळे नदी घाटावर शिवभक्त व गणेश विसर्जन आणि दुर्गा देवी विसर्जन वेळी चांगली व्यवस्था होणार आहे. तसेच अस्थिकलश विसर्जन व दशक्रिया विधी साठी नागरिकांना सुविधा प्राप्त होणार आहे.

यावेळी खासदार अनुपभाऊ धोत्रे,अकोला पूर्वचे विकास पुरुष आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या समवेत जयंतराव मसने,विजय भाऊ अग्रवाल,मनिराम टाले,विनोद मंगळे,मंगेश घुले,बाळासाहेब धुमाळे,गिरीश कोरडे,मधू पाटकर,ज्ञानेश्वर आडे,किरण ठाकरे,दत्ता भाऊ काडोळे,नंदू राठोड,सरपंच शरद ठाकरे,अतुल आवारे,पवन वर्मा आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)