बच्चन सिंग स्वतः उतरले रस्त्यावर

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_57.html 

24 तासात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली




अकोला : जुने शहरातील हरिहर (hariharpeth) पेठ येथे ऑटो चा धक्का लागल्यावरून दोन समुदायात वाद झाल्यानंतर एकमेकांवर दगडफेक (dagadfek) करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह स्वतः रस्त्यावर उतरले. पोलीस दलातील प्रचंड अनुभव असल्याने 24 तासात त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

विशेष म्हणजे एकीकडे हरिहर पेठ भागात तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने लगतच्या डाबकी रोडवर सर्व दुकाने सुरू होते. 

याप्रसंगी तुफान दगडफेक झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले. काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला व कडक बंदोबस्त परिसरात लावण्यात आला होता.




 कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केल्याने काही तासातच वातावरण शांत झाले. ऑटोरिक्षाला दुचाकीची धडक लागल्यामुळे ही घटना घडली. या भागातील जनजीवन आता सुरळीत झालं आहे. 




मध्यरात्री पोलिसांनी दंगेखोरांना अटक (atak)करण्याची कारवाई सुरू केली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 30 ते 40 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)