अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी (shivaji) महाविद्यालय अकोला चा संघ चॅम्पियन ठरला आहे. संत गजानन महाराज काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग (engineering),शेगाव येथे संपन्न झालेल्या झोन बी च्या स्पर्धेत मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा च्या संघाला ट्राय बेक्रर मध्ये हरवले. त्यानंतर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावतीला झालेल्या झोन फायनल मध्ये जी.एस. टोम्पे महाविद्यालय ,चांदुर बाजार च्या बलाढ्य संघाला श्री शिवाजी महाविद्यालय अकोला संघाने मध्यंतरानंतर पेनाल्टी किक द्वारा 1-0 अशी बढत घेतली. विजय गोल तसबुर खान या खेळाडूंनी करून पहिल्यांदाच या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवले व चॅम्पियनशिप जिंकली.
अकोला च्या संघातील अनेक स्टार खेळाडू मोहीम खान (कप्तान), अश्फाक बेहेरेवाले(गोलकीपर) साद अहमद, माजिद खान, शेख जरीर ,मो. आवेस,मो. बिलाल तसवीर खान , वजाहत अहमद ,खिजर ,राज, मोहम्मद दानिश, मोहम्मद अर्ष, अरबाज हुसेन ,मो. साद ,मो. शहरोज, शेख शहबाद ,शेख जाहिद ,अबित शहा ,समीर या सर्व खेळाडूंनी आपसी तालमेल, परफेक्ट पासेस, आणि स्ट्रॉंग डिफेन्स च्या आधारे खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करत प्राविण्य प्राप्त केले.
महाविद्यालयात फुटबॉल संघाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री दिलीप बाबू इंगोले (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक केले आणि महाविद्यालयातील क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले. चॅम्पियनशिप जिंकणे सोप नसते त्याला कठीण परिश्रम करावे लागतात. त्यासाठी सतत सराव करणे गरजेचे आहे आणि आपण उत्तरोत्तर प्रगती करावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. महाविद्यालयाचे आणि आपल्या संस्थेचे नाव क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेतली पाहिजे त्या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे उद्गार काढले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला मा. सतीशचंद्र भट्ट सर ,मा. जावेद अली(फुटबॉल खेळाडू), श्री सुरज कुमार दुबे(राज्य क्रीडा मार्गदर्शक), श्री हरणे साहेब प्राचार्य डॉ. किरण खंडारे आणि डॉ.आनंदा काळे उपस्थित होते.
पाहुण्यांना महाविद्यालयातर्फे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. सर्वांनी खेळाडूंचे कौतुक केले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व खेळाडूंचे हार घालून स्वागत करण्यात आले व त्यांचा मानसन्मान करण्यात आला व खेळाडूंना उपस्थित सर्वांना मिठाईचे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. संघाचे प्रशिक्षक निहाल चौधरी यांचे सुद्धा सत्कार करण्यात आला. मा. प्राचार्य साहेबांनी फुटबॉल च्या सर्व खेळाडूंना बक्षीस म्हणून ट्रॅक सूट आणि शूज देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. खेळाडूंना विशेष सुविधा पुरवण्याचे आश्वासनही याप्रसंगी त्यांनी दिले. महाविद्यालयाचे आणि अकोला चे मोठे नावलौकिक मिळवून देऊ याबद्दल आश्वासन केले. श्री शिवाजी महाविद्यालया, अकोला चा संघ यापूर्वी सहा वेळा द्वितीय स्थानावर राहला होता. यावर्षी प्रथमच या अभूतपूर्व यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख साहेब आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक आणि अभिनंदन केले तसेच महाविद्यालयाचे प्रबंधक श्री राजेश गीते ,सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संजय काळे यांनी सूत्रसंचालन केले क्रीडा विभागाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी दिला आणि विभागातील छत्रपती पुरस्कार विजेते, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूबाबत उपस्थित त्यांना माहिती सांगितली या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री नितीन वाघमारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव मेहंगे,निहाल चौधरी प्रशांत पाटील, रवी रामटेके ,शुभम गोडे रोहन बुंदिले ,अक्षय अंधारे इत्यादींनी अथक परिश्रम केले.