श्री शिवाजी अभियांत्रिकीमध्ये नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पनांचे प्रदर्शन

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

https://194888.click-allow.top/




 युरेका जिल्हास्तरीय 

स्टार्टअप पिचिंग स्पर्धा 


श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचालित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय येथे ३० सप्टेंबर २०२४ रोजी Ecell IIT BOMBAY च्या सहकार्याने NEC युरेका जिल्हास्तरीय स्टार्टअप पिचिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पनांचे प्रदर्शन केले.

 स्पर्धेने इच्छुक उद्योजकांना एक्सपोजर आणि मौल्यवान अभिप्राय मिळविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. थोरात होते, तसेच प्रमुख पाहुणे श्री. शैलेशजी पाटील (स्किपर Engineers, MIDC Akola चे डायरेक्टर अकोला) आणि काजल राजवैद्य (सीईओ KITS स्मार्ट टेक्नॉलॉजी, अकोला) होते. SK Agrospace चे founder and CEO तसेच आयक्यूएसी प्रमुख प्रा.डॉ. एस.के. पाटील आणि संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.एल. सातारकर यांची उपस्थिती लाभली. संगणक विभागाच्या प्रा. रुतुजा जे. देशमुख कार्यक्रम समन्वयक होत्या. बाह्य परिक्षक म्हणून श्री. शैलेशजी पाटील आणि काजल राजवैद्य यांची नियुक्ती करण्यात आली, तर अंतर्गत परिक्षक म्हणून डॉ. सचिन अग्रवाल आणि डॉ. रचना जैस्वाल उपस्थित होते.




मेहेरबानू महाविद्यालय, खंडेलवाल महाविद्यालय, आरएलटी महाविद्यालय यासारख्या विविध महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धक विद्यार्थ्यांनी युरेका झोनल फेरीत निवडून येण्यासाठी सन्माननीय परीक्षक पॅनलसमोर त्यांचे बिझिनेस प्रोपोझल सादर केले.


श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी देशमुख व कार्यकारिणी अमरावती सदस्य तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचे कार्यक्रम आयोजनास मार्गदर्शन लाभले


कार्यक्रमाचे संचालन ऋतुजा इंगोले, तन्वी आयाचित आणि प्राची भोयर यांनी केले. ई-सेलचे विद्यार्थी समन्वयक पियुष घाटे, उदय धानोकर, श्रेयश अग्निहोत्री, गुंजन नेरकर, यश यादव, विघ्नेश देशमुख यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

 अभियांत्रिकी महाविद्यालया च्याच सुदन्येश नेहेरे आणि गौरव पवार यांनी "इंटरनेटलेस एज्युकेशन" या शीर्षकासाठी प्रथम तर गौरांग खेतान आणि गटाने "ब्लेंड बॉट" या शीर्षकासाठी द्वितीय आणि  मेहेरबानु महाविद्यालयाच्या  सादिया सदफ आणि गटाने "आर३ट्रेड"    शीर्षकासाठी तृतीय क्रमांक  पटकाविला.


सुदन्येश नेहेरे आणि गौरव पवार  यांची युरेका झोनल फेरीत निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)