जानकार बनिये सतर्क रहिये

VISHAL PURANDARE
By -
2 minute read
0

  

इलेक्ट्रॉनिक बँकिंग जनजागृतीसाठी 

शुभोदय फाउंडेशन सरसावले




अकोला : सामाजिक कार्यासाठी तत्पर असलेली संस्था म्हणून शुभोदय (shubhoday)फाउंडेशन चा नावलौकिक आहे. 


संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ सौ प्रतिभा शिरभाते स्वतः विविध शासकीय उपक्रम राबवित असतात.


 या सर्व कार्याची दखल घेत सौ.मीना भागवतकर यांनी भारतीय रिजर्व बँक नागपूर द्वारा इलेक्ट्रॉनिक(electronic) बँकिंग (ई बात) प्रशिक्षण या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शुभोदय फाउंडेशन ची निवड केली.

 हा कार्यक्रम शुभोदय फाउंडेशन, सनराईज ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज सस्ती यांच्या सयुक्त विध्यमाने आयोजित करण्यात आला.


 या प्रसंगी भारतीय रिझर्व(reserve) बँकेचे असिस्टंट मॅनेजर श्री सचिन बोरकर व 

असिस्टंट मॅनेजर मनोज पवनीकर नागपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


 आजच्या मोबाईल युगात प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या फसवणूकीपासून आपण कसे सावध रहावे व कोणत्या गोष्टी आपण टाळाव्यात हे सांगितले.


 जसे कि ATM चा वापर कोड टाकताना वर हात ठेवून कोड टाईप करावा, ज्या स्थळी सिक्युरिटी गार्ड आहे तेथील ATM चा वापर करावा,फोन वर kyc, लोन, लॉटरी, लकी ड्रा,बँक खाते बंद झाले असे कॉल आले असता त्या कॉलला बळी न पडता थेट बँकेशी सम्पर्क साधावा.


 ATM कार्डचा पिन कुणाला सांगू नये,कोणतेही अपरिचित app डाऊन लोड करू नये.


 रिजर्व बँक मध्ये कोणीही खाते उघडू शकत नाही व ही बँक लोन सुद्धा देत नाही


ज्या लिंक बद्दल माहिती नाही तिला ओपन न करता आधी ओळख पटवून घ्यावी. 


जर फसवणूक झाली तर त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधावा, आपल्या कष्टाचा पैसा अशा नालायक फ्रॉड लोकांना देऊ नका.


कोणत्याही फ्रॉड फोन कॉल वर विश्वास ठेऊ नका स्वतः जागृत व्हा व दुसऱ्यांना पण जागृत करा.


भारतीय रिजर्व बँक कहता है ,जानकार बनिए, (jankar baniye) सतर्क रहिए अशा संपूर्ण विषयाची माहिती विद्यार्थी,पालक, गावकरी व शेतकरी बांधव यांना सचिन बोरकर सर व मनोज पवणीकर सुबक,सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. 


 सौ.मीनाताई भागवतकर यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये भारतीय रिजर्व बँक ,( ई बात ) बद्दल माहिती दिली.


शुभोदय फाउंडेशन चे सचिव श्री भास्कर शिरभाते यांनी स्वतः सोबत झालेला मोबाईल फ्रॉड सर्वांना सांगितला. 


डॉ. प्रतिभा शिरभाते यांनी काळाची जबाबदारी ओळखून अपडेट रहावं व सावधगिरी कशी बाळगावी याचे मार्गदर्शन केले


 तर ई बात च्या माध्यमातून जी जनजागृती होत आहे त्यामुळे नक्कीच फ्रॉडला आळा बसू शकेल असे मत संकेत शिरभाते यांनी व्यक्त केले . 


शाळेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.श्रीकांत ताले सर व संचालिका सौ चैत्रालीताई ताले यांनी सनराईज ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज सस्ती तर्फे आभार व्यक्त केले.


 कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील सस्ती श्री. विजयभाऊ सरदार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


सी.बी. इंगळे यांनी सुंदर संचालन केले.भारतीय रिजर्व बँक न कडून सर्वांना भेट वस्तू देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.


 कार्यक्रमाला कुणाल भगवतकर ,प्रज्ञा तायडे,गोपाल टाले,वैष्णवी माथनकर, शेषनाग उजाळे,प्रसन्नजित गवई,शालिनी प्रधान,माधुरी खेरडेकर, रजनी अरबाळ, सौ. रेखा उके,शुभागीं पोकळे यांची उपस्थिती लाभली.


 कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी ऍड.श्रीकांत ताले

 भास्कर शिरभाते, संकेत शिरभाते आर्किटेक मुंबई, सुधाकर गीते उपाध्यक्षप्रशांत सांगळे,कृपाल शिरभाते पुणे, राहुल भगत,वंदना खंडारे, रेणुका भगत यांनी परिश्रम घेतले तर सर्व पालक वर्ग शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांची कार्यक्रमाला उपस्थिती लागली.अतिउत्साहात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)