अकोला : शिस्त आणि संस्काराचे धडे देणाऱ्या स्काऊट आणि गाईड या संस्थेचे राज्यस्तरीय कब मास्तर (kab master) प्रशिक्षण अकोला शहरात थाटात पार पडले.
महाराष्ट्र राज्य, भारत स्काउट्स आणि गाईड्स व शिक्षण विभाग ,जिल्हा परिषद, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊट गाईड सभागृह, अकोला येथे 18 ते 24 सप्टेंबर 2024 या कालावधीत पार पडले.
शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त रतनसिंग पवार व शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा जिल्हा आयुक्त गाईड (guides) डॉ. सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर (shibir) संपन्न झाले.
शिबीर प्रमुख म्हणून जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट (scouts) श्रीकृष्ण डांबलकर यांनी प्रशिक्षणाचे यशस्वीपणे संचालन केले.
शिबीर सहाय्यक म्हणून लीडर ट्रेनर शरदचंद्र मेहेकरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती प्रेमा काटे,केंद्रप्रमुख राजेश पातळे, दत्तात्रय सोनोने ,अशोक राठोड व सौ.स्मिता डांबलकर यांनी जबाबदारी पार पाडली.
सात दिवशीय प्रशिक्षण शिबीरात रामधून व भूपाळी,सर्वांग सुंदर व्यायाम, कोपरा सजावट,ध्वजशिष्टाचार, विविध विषयांवर बौद्धिक सत्रे, ड्युटी बदल प्रक्रिया, मोगली कथा नाट्यीकरण, दीक्षाविधी समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमावर आधारित 'लाल फुल' कार्यक्रम, इन डोअर व आऊट डोअर उपक्रम, क्षेत्रभेट,सर्वधर्मप्रार्थना सभा इत्यादी उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.
कब मास्तर प्राथमिक प्रशिक्षण शिबिरास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या रत्नमाला खडके, शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा जिल्हा आयुक्त ( गाईड ) डॉ. सुचिता पाटेकर, अकोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, अकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, जिल्हा चिटणीस तथा शिक्षण विस्तार अधिकारी जि. प.अकोला विनोद मानकर,माजी राज्य आयुक्त डॉ. वसंतराव काळे, लीडर ट्रेनर व्ही.जी.शेंडे व जी.आर.चांडक,जिल्हा संघटक (हिंगोली) राजेश गावंडे,जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गाईड) सुषमा देशमुख, सहा. जिल्हा आयुक्त पी.जे.राठोड व कल्पना दास, पंकज देशमुख इत्यादी मान्यवरांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा संघटक ( स्काऊट ) महेंद्र वसावे, जिल्हा संघटक (गाईड) श्रीमती जयमाला जाधव ,कार्यालयीन कर्मचारी संतोष भेंडेकर, सुबोध शेगावकर,विक्रम काळे व नरेंद्र आठवले यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रशिक्षणात अकोला जिल्ह्यातील विविध केंद्रातील 89 युनिटलीडर सहभागी झाले होते.