शिवाजी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

 



अकोला : स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजाननराव पुंडकर प्रामुख्याने उपस्थित होते. 




म. गांधी, लालबहादूर शास्त्री, शिवाजी महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांच्या पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वागतपर भाषण प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी केले.व्यासपीठावर प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे,श्री बबनराव कानकिरड, प्रा सुशीला मळसणे,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संजय तिडके, अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे सचिव डॉ. मिलींद निवाणे उपस्थित होते.




 कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बबनराव कानकिरड यांनी म. गांधींच्या सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रम्हचर्य या अष्टांग व्रताचा युवकांनी अंगिकार करावा असे प्रतिपादन केले. डॉ. मिलींद निवाने यांनी प्रत्यक्ष चरख्यावर सूत तयार करून दाखविले व स्वतःच्या अंगातील शर्ट या सूतापासून बनविल्याचे सांगितले.



कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण एड. गजाननराव पुंडकर यांनी

केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. अर्चना पोटे (सपकाळ) यांनी केले. प्रास्ताविक व परिचय कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुशीला मळसणे व आभार प्रा मोनिका फाले यांनी मानले




. कार्यक्रमाला प्रा. गोविंद काळे (विज्ञान विभाग प्रमुख) प्रा. डॉ. अस्मिता बढे (वाणिज्य विभाग प्रमुख) प्रा. रंजीता फुटाणे (कला विभाग प्रमुख) यांच्यासह इतर सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.



    

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)