हॅण्डबाॅल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय अकोला संघ विजेता

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_33.html 

'शिवाजी'च्या खेळाडूसमोर

आरएलटीच्या चमूने हार पत्करली





अकोला : येथील वसंत देसाई स्टेडियम येथे 19 वर्षांखालील शालेय हॅण्डबाॅल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्री शिवाजी(shivaji) कनिष्ठ महाविद्यालय अकोला संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत एकतर्फी विजयश्री खेचून आणली.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत जिल्हास्तरीय शालेय हॅण्डबाॅल (handball) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अकोला महानगर पालिका क्षेत्रातील संघ उपस्थित होते. अंतिम सामन्यात वेदांत चोरे, कौस्तुभ सुळे, विनीत सोनोवणे, जय मराठे , ओम पौळ , प्रेम भवरे , रितेश पाल,मो. उझेर या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत आर. एल. टी. (RLT) महाविद्यालय अकोला संघास पराभूत करून विजेतेपद पटकावले.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, श्री राजेश गीते (प्रबंधक), प्रा. सुशिला मळसणे (कनिष्ठ विभाग प्रमुख), प्रा संजय काळे (क्रीडा विभाग प्रमुख), प्रा. नितीन वाघमारे (क्रीडा शिक्षक), सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)