प्रतीक्षा यादीतील सर्व अनुकंपा धारकांना त्वरित नियुक्ती द्या : पी बी भातकुले

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

https://194888.click-allow.top/


अकोला महापालिकेचे कंत्राटी कामगार आक्रमक




अकोला : येथील (AKOLA) महानगरपालिकेत सेवा दिलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणे आवश्यक होते. परंतु वर्षानुवर्षे ही मागणी प्रलंबित असल्याने अकोला येथील महापालिका कामगार संघटना आक्रमक झाली आहे. प्रतीक्षा यादीतील सर्व अनुकंपा (anukampa)धारक उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्यावी अशी मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष पी बी भातकुले यांनी केली आहे.

   

मनपा उपायुक्तांसोबत चर्चा ठरली निष्फळ






अनुकंपाधारकांना नियुक्ती मिळत नसल्याने 14 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण (uposhan) सुरू करण्याचा इशारा मनपा सफाई कामगारांच्या संघटनेने दिला होता. त्यास अनुसरून आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले. यावेळी प्रशासनातर्फे मनपा उपायुक्त(upayukt) गीता ठाकरे, अधीक्षक जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी खोसे यांनी प्रशासनाची बाजू मांडली. तर महाराष्ट्र राज्य मनपा, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पी बी भातकुले व अनुप खरारे यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. परंतु गुरुवारी चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका भातकुले यांनी घेतली आहे.


काय आहेत प्रमुख मागण्या?


1) प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र अपात्र अनुकंपाधारकांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी


2) अनुकंपा धारकांचे वय जास्त झाल्याचे तसेच शैक्षणिक पात्रतेचे धोरण शिथिल करण्यात यावे.


3) आरोग्य विभागात घनकचरा (ghankachra) व्यवस्थापन काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी


4) कंत्राटी कामगारांना आवश्यक असलेले साहित्य, गणवेश, दिवाळीचा बोनस (bonus) कंत्राट दारा मार्फत देण्यात यावा.


उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात धाव घेणार


अनुकंपा यादीतील अपात्र ठरविलेल्या उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेणार असल्याचे मनपा कंत्राटी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पी बी भातकुले व अनुप खरारे यांनी सांगितले आहे


उद्या पुन्हा होणार चर्चा !


आज मनपा उपायुक्तांशी चर्चा निष्फळ ठरली. तसेच लवकरच विधानसभेच्या निवडणुकीचे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कामगार संघटनेचे पदाधिकारी उद्या एकत्र येणार असून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)