शालेय खो-खो स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाने दुहेरी मुकुट पटकावले

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_28.html 




अकोला : शिवाजी महाविद्यालयातील क्रीडापटूंची आगेकूच सुरूच आहे. 



एका मागे एक स्पर्धा जिंकत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या नाव लौकिकात भर टाकली आहे. 



जिल्हा स्तरीय शालेय खो-खो (khokho)स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय अकोला मुले आणि मुली संघांनी दुहेरी मुकुट संपादन करीत क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले.



स्थानिक वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे जिल्हास्तरीय मुली व मुलांची शालेय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.



 या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुलांच्या संघाने आर.एल.टी.(rlt) महाविद्यालय तर मुलींच्या संघाने स्कूल ऑफ स्काॅलर्स(scholars)हिंगणा संघांचा पराभव करत आपल्या संघाचे वर्चस्व प्रस्थापित केले.



 या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्री रामेश्वर भिसे, श्री राजेश गीते, प्रा. सुशिला मळसणे, प्रा श्री संजय काळे, प्रा. श्री नितीन वाघमारे (क्रीडा शिक्षक), श्री रवी रामटेके (प्रशिक्षक) सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे कौतुक केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)