जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा दणदणीत विजय

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

 शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या

 क्रीडापटूंनी विजयश्री खेचून आणली.


  सध्या क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धांमध्ये श्री शिवाजी महाविद्यालयाचे नाव चर्चेत आहे. 

नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात निकराची झुंज देत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडापटूंनी विजयश्री खेचून आणली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा स्कूल ऑफ स्काॅलर्स हिंगणा रोड अकोला येथे आयोजित करण्यात आल्या. 

या स्पर्धेत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अकोला संघाने सेमी फायनल मध्ये आर.एल.टी. महाविद्यालय अकोला संघाचा पराभव केला.

 त्यानंतर अंतिम सामन्यात प्रवेश करीत जिजाऊ विद्यालय अकोला संघासोबत अंत्यत चुरशीच्या लढतीत संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय प्राप्त केला.


विजयाचे मानकरी

 संघात निलम वानखडे, पायल चव्हाण, खुशी कंतीकर, अनुजा कुंबलकर, नेहा निकम, रिया येरे हे शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी बास्केटबॉल स्पर्धेतील विजयाचे मानकरी ठरले आहेत.


विद्यार्थ्यांचे अभिनंदन

 या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्री रामेश्वर भिसे, प्रबंधक श्री राजेश गीते, प्रा. सुशिला मळसणे (कनिष्ठ विभाग प्रमुख) प्रा. संजय काळे (क्रीडा विभाग प्रमुख), प्रा. आर.ए. वानखडे, प्रा. नितीन वाघमारे (क्रीडा शिक्षक), सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

गुगल वर सर्च करा : https://tumchyasathich.blogspot.com/2024/09/blog-post_1.html


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)