मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

भर उन्हात जनगणना प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचे हाल, मनपाचा ढिसाळ कारभार

                              विशाल पुरंदरे   अकोला : शहरातील जनगणना करण्यासाठी शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रचंड तापमान असतानाही सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत उन्हाच्या वेळी प्रशिक्षण ठेवल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाची लाही लाही होत आहे. सध्या अकोला महापालिका दक्षिण झोन अंतर्गत स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काही प्रशिक्षणार्थीं ची एसी हॉलमध्ये व्यवस्था असल्याने त्यांना अजिबात त्रास नाही. मात्र इतर प्रशिक्षणार्थींची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षणार्थींना दिवसभर घामाच्या धारा लागल्या.  दोन कुलर केवळ नावापुरता ठेवले होते. दोन्ही कुलर आपोआप बंद पडले. एवढेच काय तर ठेवलेल्या खुर्च्या मध्ये शिक्षक बसल्यानंतर जुन्या खुर्च्या तुटून शिक्षक खाली पडले. दुपारी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर एक टेक्निशियन पाठविण...

भाऊसाहेबांना भारतरत्न मिळण्यासाठी पाठपुरावा करणार खा.अमरभाऊ काळे



 नांदगांव खंडेश्वर येथे सत्कार सोहळा


 अमोल धवसे 


नांदगाव : मतदारांनी मला मतरुपी आशीर्वाद देऊन संसदेत पाठविले, त्यामुळे त्यांचा मी आजन्म ऋणी राहील. या ऋणातून मी कधीही उतराई होणार नाही. या जिल्ह्याकरिता अभिमानाची बाब असलेले देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न उपाधी मिळण्यासाठी मी पाठपुरावा करेल,अशी ग्वाही वर्धा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांनी मतदारांना दिली. ते नांदगाव खंडेश्वर येथील सत्कार समारंभाप्रसंगी सत्काराला उत्तर देताना बोलत होते.


 यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, युवा नेते सलील देशमुख, राकाँचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, ज्येष्ठ नेते गणेश राय, विजय भैसे, संगीता ठाकरे, नांदगांव खंडेश्वर तालुकाध्यक्ष सचिन रिठे, साजिदभाई आदीउपस्थित होते. 


सत्काराला उत्तर देताना खा. अमर काळे पुढे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अशीच सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सुद्धा एकजूट ठेवून महाविकास आघाडीचे सरकार या राज्यांमध्ये आणायचे आहे.


सध्याचे सरकार हे अत्यंत बोगस व खोटे बोलणारे असून जनतेची दिशाभूल करणारे आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारे अनुदान हे जावयाच्या खिशाला कात्री लावून दिले जात आहे. 

देशात आणि राज्यात अत्यंत महागाई वाढलेली असून सर्वसामान्य व शेतकरी

शेतमजुरांचे जगणेकठीण झालेले आहे. 


गोरगरिबांच्या कष्टाच्या पैशातून लाडकी बहीण योजनेला अनुदान दिले जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन रिठे यांनी केले. संचालन प्रा. दिलीप उगले यांनी तर आभार मोहन चोरे यांनी मानले.


कार्यक्रमाला तालुक्यांतील ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण रंगाचार्य,साहेबराव कडू, मोहन चौरे, मनोज गावंडे, गौरव भोयर,हितेश शेळके,अमोल हिरोडे,शरद देवरणकर, किशोर गुलालकरी, प्रमोद ठाकरे, प्रभाकर काळमेघ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या