मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

प्रा. दादाराव गायकवाड यांना पी एच डी पदवी.




अकोला, दि २२ : स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला च्या इंग्रजी विषयाच्या संशोधन केंद्राचे विद्यार्थी प्रा. दादाराव गायकवाड यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतीच पी एच डी पदवी प्रदान केली आहे. तशाप्रकारचे नोटीफिकेशन प्राप्त झाले आहे.



प्रा दादाराव गायकवाड यांनी इंग्रजी विभाग प्रमुख डॅा पी पी देशमुख यांच्या मार्गदर्शनात “Post Independence Theatrical Innovation, with reference to Girish Karnad Play” या विषयावर संशोधन कार्य करुन पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनी पत्नी सौ. संध्या गायकवाड दोन मुले सलोनी व तथागत यांना दिले आहे.



त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॅा रामेश्वर भिसे, प्रोफेसर डॅा एम आर इंगळे, प्रभारी-प्राचार्य डॅा अलका मानकर, डॅा आशिष राऊत, डॅा नाना वानखडे, डॅा दिपक कोचे, डॅा. संजय पोहरे, डॅा वासुदेव गोलाईत, डॅा रोनिल आहाळे, डॅा कपीला म्हैसणे, डॅा मनोहर वासनिक, प्रा राहुल माहुरे, डॅा चंद्रकांत धुमाळे, प्रा विशाल नंदागवळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या