अकोला - १९०९ मधे स्थापन झालेल्या व तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुने शहर अकोला येथील श्री राठोड पंच बंगला रजिस्टर नंबर २३१ए या संस्थेच्या अध्यक्षपदी शिक्षण तज्ञ प्राध्यापक प्रकाश डवले यांची अविरोध निवड नुकतीच करण्यात आली.
अकोल्यातील प्राचीन संस्कृतीचा वारसा असणाऱ्या श्री राठोड पंच बंगला या संस्थेची आमसभा अक्षय तृतीयेच्या दिवशी संपन्न झाली. या सभेमध्ये उपस्थित राठोड तेली समाजाने सर्वानुमते शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचे संचालक , अर्थतज्ञ , समाजसेवी प्राध्यापक प्रकाश डवले यांची अविरोध निवड केली . यावेळी समाजाच्या वतीने निवडणूक अधिकारी रमेश गोतमारे उपस्थित होते. मंचावर माजी अध्यक्ष दिलीप नायसे , संजय वानखडे , उमेश सापधारे , प्रशांत चोपडे , दिलीप भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती . नवीन कार्यकारिणीची नेमणूक अध्यक्ष प्रकाश डवले यांनी केली. त्यामध्ये अध्यक्ष - प्रकाश डवले , उपाध्यक्ष - गजानन बोराडे , मनोज वानखडे , राजेंद्र गोतमारे , सचिव - मंगेश वानखडे , सहसचिव - ललित भगत , कोषाध्यक्ष - प्रशांत शेवतकर , सहकोषाध्यक्ष - निलेश कपले , प्रसिद्धी प्रमुख - यश डेरे , कायदेशीर सल्लागार - ॲड भूषण भागवत , ॲड वैष्णवी काठोके , सदस्य - गोपाल राऊत , राजेश पातळे , मदन भिरड , प्रवीण झापर्डे , देवेंद्र भिरड , केशव साकरकार , विजय वानखडे , वैभव मेहरे , विशाल गमे , प्रमोद चोपडे , नवीन अकोटकर , वैभव नवथळे , पवन मेहसरे यांची निवड करण्यात आली. सल्लागार मंडळामध्ये समाजातील मार्गदर्शक - सुधाकरराव झापर्डे , बालमुकुंद भिरड , विष्णुपंत मेहेरे , वामनराव चोपडे , रमेश गोतमारे , गोपाळराव भिरड , प्रकाश फाटे , माणिकराव नालट , दिपक इचे , रामेश्वर वानखडे यांचा समावेश करण्यात आला.