संजयला दिला यशश्रीने मदतीचा हात

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

https://tumchyasathich.blogspot.com/2025/03/blog-post_4.html 



खाटेवरील रुग्णाला दिलासा


अकोला : पोळा चौकात राहणारे संजय जाधव गेल्या तीन चार वर्षापासून आजारी आहेत. बेडवरच त्यांचे सर्व उपचार सुरू आहेत. आपल्याकडे कोणीतरी लक्ष द्यावे, विचारपूस करावी अशी कोणत्याही रुग्णाला अपेक्षा असते. अशातच सामाजिक कार्यकर्ते आकाश ठाकरे यांना संजय बद्दल माहिती मिळाली आणि मदतीचा हात पुढे करण्यासाठी ते तातडीने सरसावले.

आकाश ठाकरे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. गोरगरीब, गरजू रुग्णांना अन्नदान करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. यशश्री जनकल्याण फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची ज्योत प्रज्वलित केली आहे. 

आकाश ठाकरे आणि यशश्री फाउंडेशनचे कार्यकर्ते संजय जाधव यांच्या घरी पोहोचले. त्यांची संपूर्ण व्यथा जाणून घेतली. त्यांना रोज डायपर ची आवश्यकता असल्याचे समजले. संजय जाधव यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यांचे सर्व घर त्यांची पत्नी नीता संजय जाधव यांच्यावर निर्भर आहे, त्यांना हवा तेवढा पगार नसल्याने घर सांभाळणे व संजय जाधव

यांच्या उपचाराचा खर्च करणे कठीण जात होते.

 म्हणून यशश्री जनकल्याण फाउंडेशनच्या मार्फत त्यांना कमीत कमी 2 महिने पुरेल अशी डायपर ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)