अकोला : विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शिवाजी महाविद्यालयाच्या क्रीडापटूंनी आणखी एक यशाचे शिखर गाठले आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे नुकत्याच झालेल्या विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे दि.29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान शालेय रायफल शूटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकोला येथील खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. यात कु. सानिका वाडेकर (पीप साईट)हिने 391 गुणांसह सुवर्ण पदक प्राप्त केले. कु. श्रृती बढे (ओपन साईट) हिने 346 गुणांसह सुवर्ण पदक तर कु. जान्हवी मेश्राम (ओपन साईट) हिने 343 गुणांसह रौप्य पदक प्राप्त केले. हे सर्व खेळाडूं आगामी राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्र झाले आहे. या सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, श्री राजेश गीते (प्रबंधक), प्रा सुशिला मळसणे(कनिष्ठ विभाग प्रमुख), प्रा संजय काळे (क्रीडा विभाग प्रमुख), प्रा नितीन वाघमारे (क्रीडा शिक्षक), श्री विन्सेंट आमेर ( प्रशिक्षक), सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.