श्री शिवाजी महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम
अकोला : जगप्रसिद्ध व्याख्याते विल हॅरीस यांचे नुकतेच श्री शिवाजी महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विल टू विन या विषयावर बोलताना हॅरीस यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याने हजारो विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रबळ इच्छाशक्ती असली तर जगात काहीही शक्य आहे हे विविध उदाहरणांनी पटवून दिले.
वी आर वन म्हणजे आपण सर्व एकच आहोत हे देखील सांगितले. छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचा इतिहास विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे उभा केला.
विल हॅरीस यांचे भाषण सुरू होताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. हॅरीस यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले, अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला पुस्तक बक्षीस म्हणून दिले. यावेळी प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हॅरीस यांच्या वक्तृत्व कलेचे कौतुक केले. आपण एक सर्वोत्कृष्ट शिक्षक असल्याचे सुद्धा सांगितले. वृद्धाश्रम, अनाथ आश्रम यासारख्या ठिकाणी जाऊन सुट्टीच्या दिवशी निदान आपले दोन तास द्या असे आवाहन विल पावर ह्युमॅनिटेरियन विल पावर कन्सल्टन्सी या संस्थेचे को फौंडर शुभम नागपुरे यांनी केले.
व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे, प्राध्यापक डॉक्टर संजय तिडके, शुभम नागपुरे, पवन गवई उपस्थित होते. संचालन व आभार अस्मिता बढे यांनी मानले. याप्रसंगी शिवाजी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.