शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट !

VISHAL PURANDARE
By -
1 minute read
0

 


 



कपाशीवर लाल्या (lalya) व करप्या (karpya) रोगाचा प्रादुर्भाव



 राजकुमार वानखडे


अकोट : तालुक्यातील अनेक गावातील कपाशीची पिके भर हिवाळ्यात उलंगवाडीवर आली आहेत. यामुळे शेतकरी (shetkari)चिंताग्रस्त झाला आहे. खारपानपट्ट्यातील मुंडगाव ,वणी वारुळा, लामकानी, खेर्डा ,सोनबर्डी, तांदुळवाडी, बळेगाव, सुलतानपूर ,आलेगाव, पिंपरी डिक्कर, देवरी ,आलेवाडी ,कावसा कुटासा, तरोडा,मरोडा,वरूर जऊळका,दिनोडा,सह असंख्य खारपणपट्ट्यातील गावांमधील कपाशी पिकावर धुक्याने तसेच लाल्या व करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके पूर्णता सुकले असून हिवाळ्यातच कपाशी पिकाची उलंगवाडी होण्याची दाट शक्यता आहे. 


कपाशीच्या उत्पादनात घट


कापसाचे उत्पादन सुद्धा खारपणपट्ट्यात यावर्षी कमी प्रमाणात होणार आहे. सध्य स्थितीत खारपाणपट्ट्यातील गावांमधील शेतीतील कपाशी(kapashi) पिके जळल्यासारखे आढळून येत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या घरात कापूस एकरी 50 ते 60 किलो च्या दरम्यान आला आहे. परंतु यावर्षी कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे निसर्गाचा कोप तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.



बोंड अळी करपा सारख्या रोगांनी शेतकरी हवालदिल



 कपाशीवर अमेरिकन अडी बोंड अळी लाल्या, करपा यासारख्या रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी कपाशीची पेरणी केल्यापासून ते कापूस घरी येईपर्यंत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे परंतु यावर्षी केलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे. तेव्हा शासनाने संबंधित खारपानपट्ट्यातील चिंताग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे तसेच शेतकऱ्यांना योग्य तो भाव सुद्धा मिळावा अशी मागणी सुद्धा शेतकरी वर्गांनी केली आहे.


प्रतिक्रिया


माझ्या शेतातील तीन एकरातील कपाशीचे पीक पूर्णता सुकलेले असून मला तीन एकरामध्ये दीड क्विंटल कापूस झाला आहे. परंतु आता कपाशीचे पीक सुकल्यामुळे घरात कापूस येण्याची कोणतीही शक्यता नाही..

 - अनंत पालखडे, शेतकरी वणी वारुळा


प्रतिक्रिया


खारपाणपट्ट्यातील शेतीमधील कपाशीचे पिके पूर्णतः सुकून गेल्याने हिवाळ्यातच कपाशी पिकाची उलंगवाडी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आला आहे. 


- श्याम खोकले,

 गजानन वारकरी, शेतकरी मुंडगाव

........


प्रतिक्रिया


यावर्षी कपाशी पिकावर लाल्या करपा अमेरिकन अडी बोंड अळी त्याचप्रमाणे धुक्याने सुद्धा काही कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तेव्हा शासनाने कपासी धारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी प्रयत्न करावे


 - किशोरआवारे,बबन वडतकार 

शेतकरी सोनबर्डी


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)