मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैशिष्ट्यीकृत

शारदाताई खेडकर, विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात मोरणा स्वच्छतेसाठी 10 संघटना सरसावल्या

   अकोला : अकोला महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दुसऱ्या दिवशी सुद्धा मोरणा नदी स्वच्छता अभियान जोरात सुरू होते. मोरणा नदीचा चेहरा मोहरा पालटण्यासाठी भाजप नेते रणजीत खेडकर व विजय अग्रवाल मोरणा नदीच्या काठावर तळ ठोकून बसले आहेत.  800 मीटर जलकुंभी काढण्याचे काम आतापर्यंत पूर्ण झाले. विविध सामाजिक संस्था संघटना मोरणा नदी स्वच्छतेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी पुढे येत आहेत.  यामध्ये जगदंबा मित्र मंडळ, संत गाडगेबाबा मित्र मंडळ, झुलेलाल युवाशक्ती, श्याम बाबा युवाशक्ती, राज राजेश्वर युवाशक्ती, आदिवासी युवाशक्ती , अमरनाथ यात्रा युवाशक्ती यासह विविध सामाजिक संघटना सहभागी आहेत. या संघटनांमधील कार्यकर्त्यांचे स्वागत भाजप नेते आमदार रणधीर सावरकर यांनी केले.  जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी टीमवर्क आवश्यक आहे. रचनात्मक कार्य करण्यासाठी वेळेसोबत परिश्रमाची गरज आहे. कोणालाही नावे ठेवणे सोपे आहे मात्र प्रत्यक्षात काम करून दाखविणाऱ्याच्या मागे जनता उभी असते असे प्रतिपादन महापौर शारदाताई खेडकर यांनी केले आहे. मोरणा नदी अकोला शहराची जीवनव...

शारदाताई खेडकर, विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात मोरणा स्वच्छतेसाठी 10 संघटना सरसावल्या